Team Khulasa:

राज्य : महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी २५ टक्के पगारवाढ होण्यासाठी इंटेक संघटनेचे राज्यातील ३५ हजारांहून अधिक एसटी कर्मचारी संपावर उतरले होते. ज्यामुळे बऱ्याच प्रवाशांचे हाल झाले. व संपामुळे त्यादिवशीचा पगार कापण्याचाही आदेश दिला गेला होता. परंतू ठरल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांचे वेतन वाढण्याऐवजी पगार कपातीमध्येही कर्मचाऱ्यांसोबत फसवणूक केली गेली असल्याचा महाराष्ट्रातील इंटेक संघटनेचा आरोप आहे.
पगारवाढीसाठी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार दिला जाणार नाही असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले होते. मात्र असे आश्वासन दिले असताना देखील कर्मचाऱ्यांचा एकापेक्षा अधिक दिवसांचा पगार कापण्यात आला,
संप केल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांना नियमानुसार ७ दिवसांचा पगार कापण्याची नोटीस दिली होती. परंतु दिवाकर रावते यांची इंटेकच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर एकाच दिवसाचा पगार कापण्याचे ठरले होते. असे असताना देखील ” किती दिवसांचा पगार कापावा याबाबतीत माझ्याजवळ प्रस्ताव येईल व त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल” असे दिवाकर रावते यांनी सांगितले. तरी ही एका दिवसा ऐवजी अधिक दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना फसवल्याचे इंटेक संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. अशी खोटी आश्वासनं देऊन
कर्मचाऱ्यांना आशावादी बनवत इंटेक संघटनेसोबत फसवणूक झाल्याचे महराष्ट्रातील इंटेकचे सर्व कर्मचारी बोलत आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या अश्या निर्णयाने त्यांच्यात व कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे.