narbali
Team Khulasa

लातूर : जिथे लोकांना कर्मावर विश्वास ठेऊन पुढे चालायला हवे अश्या २१ व्या शतकात अजूनही काहिक अंधश्रद्धेला गुंडाळून बसलेले लोकं मागेच राहिलेले आहेत. लातूरमध्येही अश्याच अंधश्रद्धेच्या नावाखाली एका १९ वर्षीय मुलाचा बळी देण्यासाठी अपहरण केल्याची घटना सामोर आली आहे. या मुलाने पाऊस पडण्यासाठी नरबळी द्यायला आपले अपहरण केल्याचा SMS देखील घरच्यांना पाठवल्याचे समजले आहे. यामुळे मुलाच्या कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी कुटुंबीयांनी लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून, अपहरण झालेल्या विक्रमने पाठवलेला SMS देखिल पोलिसांना दाखवला आहे.
पाण्याच्या दुष्काळाने त्रस्त झालेले लातूरमधील नागरिक अनेक कष्ट करून पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे त्याच लातूरमध्ये पाणीटंचाई दूर होण्यासाठी पाऊस पडावा म्हणून अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या प्रसाद सागर याने लातूरच्या रामनगर येथे राहणाऱ्या एका १९ वर्षीय विक्रम मुरलीधर पांचाळ या मुलाचे नरबळीसाठी अपहरण केल्याचे उघड झाले आहे. हे सुद्धा विक्रमने आपल्या घरातल्यांना केलेल्या sms मुळे समजले आहे. sms मध्ये विक्रमने असे लिहिले आहे कि, “प्रसाद सागर याने माझे अपहरण केले आहे व पाऊस पडावा म्हणून ते उद्या माझा नरबळी देणार आहेत. यासाठी त्यांनी मला बाभळगावाकडे आणले आहे. तुम्ही लवकर या व मला इथून सोडवा”.
२९ जानेवारीला दुपारी विक्रम गायब झाला होता त्यांनंतर त्याच्या मोबाईलमधून दुपारी ०२ वाजून ३६ मिनिटांनी विक्रमच्या मामाला असा SMS आल्यामुळे विक्रमच्या घरच्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रारिची नोंद झाली असून पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.