29 feb 16 news
Team Khulasa

बीड : ठाण्यामध्ये महिला कॉन्स्टेबलला मारहाण करणाऱ्याला फक्त एक दिवसाची पोलिस कोठडीची शिक्षा सुनावल्याची बातमी ताजी असतानाच आता जिकडे-तिकडे जनतेच्या सुरक्षितेसाठी असलेल्या पोलिसांनाच मारहाण करत असल्याचे प्रकरण समोर येत आहेत. बीडमध्येही भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कार्माचाऱ्यासोबतही अश्याच प्रकारची घटना घडली आहे.
आपल्या कर्तव्याचे पालन करुण रस्त्यावरील भांडण मिटवायला गेलेले कैलास ठोंबरे या पोलिस कर्मचाऱ्याला जबर मारहाण केली असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परंतु कैलास ठोंबरे यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजले आहे. इथे बीडमध्ये हे प्रकरण चालू असतानाच तिथे कल्याणमध्ये देखील वाद मिटवायला गेलेल्या दोन पोलिसांना काहिक मद्यपींनी मारहाण केली आहे. यामध्ये पोलिसांना मारहाण करणाऱ्या नितीन आणि निलेश रांजणे या दोन भावांविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
परंतु दिवसेंदिवस वाढणाऱ्या या मारहाणीवरून संतप्त पोलिस दल नाराजी व्यक्त करत आहेत. कारण इतके असताना देखील या प्रकरणांवर दुर्लक्ष केलं जात असून, अद्यापही मारहाणी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात नाही आहे.