Team Khulasa

मीरारोड : मीरारोड येथील काशीमिरा पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या काजुपाड़ा गावात एका साडेतीन वर्षाच्या मुलाचे अपहरण करुन हत्या करण्यात आली असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मयत मुलाचे २२ मार्चला अपहरण झाले होते आणि रविवार त्याचा मृतदेह जंगलात सापडला.
मयत बालकाचे नाव हितेश उर्फ मोनू चौधरी आहे. मोनूचे २२ मार्चला त्याचे राहते गाव काजुपाड़ा येथून अपहरण झाले होते. त्यानंतर सहा दिवसांनी मोनूचा मृतदेह घोडबंदर रोडवरील सुधांशु महाराज्यांच्या आश्रमच्या पाठीमागे जंगलात एका ब्यागेत सापडला. याप्रकरणी अपहरणानंतर मोनुच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार केली होती परंतु पोलिसांनी मोनुला शोधण्याचा प्रयत्नही केला नाही. व म्हणुनच पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे मोनुची हत्या झाली असा आरोप मयत मोनूची आजी लीलाबाई चौधरी यांनी काशीमिरा पोलिसांनवर केला आहे. याप्रकरणाचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा घोडबंदर रोडवर असलेल्या शुधांशुमहाराज आश्रमच्या लोकांना कम्पाउंडच्या पाठीमागे जंगलात एक बॅग दिसली आणि त्या बॅगेतून दुर्गंध येत होता. आश्रमच्या लोकांनी याची माहिती लगेचच काशीमिरा पोलिसांना दिली. त्यानंतर काशिमिरा पोलिसांनी ब्याग उघडून पाहिली असता पोलिसांना त्यामध्ये मोनुचा मृतदेह सापडला.

दरम्यान मोनूच्या कुटुंबियांच्या तक्रारीवर पोलिसांनी त्यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या बाबा साहेब गौतम वाकळे याला अपहरण आणि हत्येच्या आरोपात अटक केली आहे. मात्र हत्येच नेमक कारण अजुनही स्पष्ट झाल नसुन पोलिस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत. अधिक माहितीसाठी पहा वरील व्हिडीओ.