Team Khulasa

पुणे : पुणे जिल्यातील जुन्नर तालुक्यातील धोलवड ग्रामस्तांची ग्रामदेवता म्हणजे मळगंगा देवी. या देवीची यात्रा मोठ्या उत्सहात पार पाडली जाते. धोलवडचे ग्रामस्थ मोठ्या भक्तीभावाने ३ दिवस यात्रा साजरी करतात. या यात्रेसाठी मुबईहून लोक देवीच्या यात्रेला सहभागी होतात. दरवर्षी चैत्र महिन्याच्या अस्ठ्ठ्मी, नवमी आणि दशमी या दरम्यान हि यात्रा पार पडली जाते, हि पुरातन देवी असून या देवीवर गावातल्या लहान-थोरांची सर्वांचीच श्रद्धा आहे.
पुणे जिल्यातील छोटेसे धोलवड गाव. जुन्नर तालुक्यातील ओतूर–ओझर रोड हे गाव वसले असून एप्रिल–मे महिना आला की या गावकऱ्यांना वेध लागातात ते देवीच्या जत्रेचे. कारण दरवर्षी चैत्र महिन्याच्या अस्ठ्ठ्मी, नवमी आणि दशमी या दरम्यान देवीची यात्रा मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते, निसर्गरम्य वातावरणात पुष्पावती नदीच्या तीरावर या मळगंगा देवीच मंदिर आहे. आणि त्यातच गावाकडची जत्रा म्हणजे त्यातल “गावपण” जे अजूनही गावकऱ्यांनी टिकून ठेवले आहे. जत्रेच्या या दिवसात गावात घराघरा समोर रांगोळ्या काढ्ल्या जातात. गावातले लोक तर जत्रेच्या दिवसात देवीची पूजा अर्चा तर करतातच मात्र नोकरी निमीत्ताने मुंबई आणि आसपासच्या परीसरात स्थाईक असणारे गावकरी आवर्जून आपल्या मुला बाळा सहित देवीच डोळे भरून दर्शन घ्यायला येतात. तीन दिवसातला एक दिवस का होईना या गावच्या पवित्र भूमीला पाय लावून देवीच हे रूप डोळ्यात साठवण्यासाठी आवर्जून येतात. लग्न होऊन सासरी गेलेली या गावातील कन्या देखील ३ दिवस या जत्रेला येवून देवीकडे सुख समृद्धी मागन्यासाठी आवर्जून येतात. मागील अनेक वर्षांपासून गावातील पिढ्यान-पिढ्या लोक या देविची मनोभावे पूजा-पाठ करत आले आहेत, म्हणूनच हि मळगंगा माता देखील या धोलवड गावावर कृपा दृष्टी ठेवून आहे. म्हणूच की काय गावातल्या या नदीच पाणी आज पर्यत कधी हि कमी झाले नाही. राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळच चित्र असतानाही देवीच्या कृपा आशीर्वादाने या नदीच पाणी अजूनहि कमी झाले नाही. आणि गावात पाण्याचीहि कमतरता नाही. देविच्या या सात बहिणी असून या सात बहिणी पुणे जिल्ह्यात आस-पास वसलेल्या आहेत. आणि देवीच्या या सात बहिणीं पैकी एक म्हणजे हि मळगंगा देवी. असा या देवीचा महिमा सागितला जातो. यात्रेच्या दिवसात देवीला चांदीच्या मुखवट्याने आणि दागिन्यांनी सजवले जाते.
यात्रेच्या पहिल्या दिवशी मांडव डहाळे चा कार्यक्रम पार पडला जातो आणि याच मांडव दहा डहाळयाने यात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. थोडक्यात मांडव डहाळे म्हणजे देवीच्या मदिरा भोवती मांडव टाकून सावली करायची, ज्याच्या घरी बैलगाडी आहे तो आपली बैलगाडी सजवून आंब्याचे डहाळे ,कडूलिंबाचे डहाळे, बैलगाडीत आणतात. गावाच्या चावडी पासून वाजत गाजत बैलगाडीतून हे मांडव डहाळे मिरवायला सुरुवात होते. सोबत भंडार्‍याची उधळण देखिल केली जाते. त्यामुळे सर्वत्र वातावरण देखिल भंडारामय होऊन जात. सजवलेल्या या बैल गाड्या आणि त्यातल्या हे मांडव डहाळे देवीच्या मंदिराजवळ वाजत-गाजत आणले जातात आणि देवीच्या मंदिरा समोर केलेल्या मांडवावर टाकले जातात. मांडव डहाळेच्या या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर तरुण मंडळी हजेरी लावतात.
यात्रेच्या धोलवड गावच्या या जत्रेच महत्वाचा दिवस म्हणजे चोळी पातळाचा. चोळी पातळ म्हणजे गावातील महिला घराघारातून देवीसाठी साडी आणि नारळाची ओटी आणतात मात्र हे देखिल वाजत गाजतच. गावाच्या चावडीपासून वाजत-गाजत महिला देवीसाठी चोळी पातळ आणतात. कुणी डोक्यावर घेवून अनेक महिला यात सहभागी होत असतात. गावातील प्रत्येक घरातील एक तरी महिला याची चोळी पातळाच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात, नंतर संध्याकाळी देवीची आरती झाल्यावर या महिला देवीची ओटी भरून देवीला हे चोळी पातळ मळगंगा मातेच्या चरणी अर्पण करतात. यादिवशी घराघरात पुरण पोळीच जेवण बनवून देवीला नैवद्य दाखवला जातो. महिलाच्या या चोळी पातळच्या कार्यक्रमात अनेक पुरुष मंडळी लेझीम देखिल खेळतात. या जत्रेत काठी नाचवण्याचा कार्यक्रम देखील असतो. गावातल्या तरुनां सोबत जेष्ठ मंडळी देखील डोक्यावर आणि खांद्यावर काठी घेऊन नाचवतात. उंच-उंच अशी ५० फुटांहून लांब असणारी काठी डोक्यावर नाचवली जाते. आणि त्यातही सोबत तडम तशा असतोच. हि काठी आपल्या डोक्यावर घेवून नाचवायला प्रत्येकाला आनंद आसतो.
गावाकडची जत्रा म्हटल की कुस्तीचा आखाडा आलाच. जत्रे निमित्ताने कुस्तीचे सामने देखील भरवले जातात. आस-पासच्या गावातले कुस्ती पैलवान आपल्या कुस्तीच कौशल्य दाखवतात. आणि पैलवानाची हि कुस्ती पहल्या गावकरी हि आवर्जून हजेरी लावतात. जत्रा म्हटल की खेळन्यांची आणि भांड्याची दुकान आली. जत्रेत मिळणाऱ्या जवळपास सर्वच वस्तू आपल्याकडे असतात पण जत्रेची आठवण म्हणून या जत्रेतून स्वत:साठी नाहितर मुलासाठी काहीतरी खरेदी करायला देखील मोठी झुबड उडालेली असते. गावाकडच्या या जत्रेच्या निमित्ताने जुने मित्र मैत्रीनींच्या भेटी-गाठी होतात. आणि भेट गाठ झाली तर मग गप्पा गोष्ठी रंगायला वेळ हि लागत नाही.
तीन दिवसाची हि यात्रा आनंदात पार पडल्यावर या मळगंगा मातेचा आशीर्वाद सोबत घेवून मुंबईकर पुन्हा परतीच्या प्रवासाला लागतात, आणि त्यांना पुन्हा वेध लागतात ते पुढच्या वर्षीच्या जत्रचे.