Arvind Boritha

मुंबई : मुंबईच्या खड्ड्यात गाडी पडून एका बाईक चालकाचा मृत्यू झाला आहे यामुळे मुंबईच्या नागरिकांचा संताप वाढला आहे. याबाबत कॉंग्रेसनेही जे. जे. मार्ग पोलिस स्थानका बाहेर BMC व शिवसेने विरोधात मोर्चा काढला.
जे जे पोलीस स्टेशन जवळ काढण्यात आलेल्या मोर्च्यात मुंबईतील नागरीकां सोबत मिळून काँग्रेस ने शिवसेना व BMC चा विरोध केलाच शिवाय स्थायी समिती अध्यक्षांना अटक करा अश्याही बोर्डचा समावेश त्यांनी मोर्च्यात करून त्यांची मागणी पूर्ण करण्यास सांगितले. या मोर्च्या मध्ये संजय निरुपम एम. एल ए. अमीन पटेल. उसुफ अब्रानी तसेच दक्षिण मुंबईचे सर्व नगरसेवक सहभागी होते.