2016-12-19-local_ns

Team Khulasa

दिव्यातील अपुऱ्या लोकल सेवेमुळे प्रवासी काहीसे नाराज होते. दिव्या मध्ये लोकल सेवा सुरु करावी यासाठी प्रवासांनी अनेकदा मागणी देखील केली होती परंतु, कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही. २ जानेवारी २०१५ ला अखेर प्रवासांचा उद्रेक झाला. आक्रमक पवित्रा घेत प्रवासांनी रेल्वेमार्ग रोखून आंदोलन केले. याचाच परिणाम असा झाला कि, केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी जलद गाड्यांना दिव्यात थांबा देण्याची घोषणा केली.

दिव्यातील प्रवासी जिची अतुरेतेने वाट पाहत होते, ती वेळ अखेर आली. रविवारी सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी पहिली जलद लोकल दिव्यात थांबली. सुट्टीचा दिवस असून देखील प्रवासानी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावून जल्लोषात लोकलचे स्वागत केले.

खासदार श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, ठाण्याचे महापौर संजय मोरे आदींनी या खास क्षणी उपस्थिती लावली. अखेल 2 वर्षानंतर रविवारी पहिली जलद लोकल दिवा स्थानकावर थांबली व प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.