sap

Team Khulasa

नवी मुंबई: कोब्राला कीस करून फोटो काढण एका सर्प मित्राला जीवाबर बेतल आहे.सापाच्या दंशाने नवी मुंबईतील सोमनाथ म्हात्रे या सर्प मित्राचा मृत्यू झाला. सापाच्या दंशाने मृत्यू होण्याची १२ वर्षातली हि 31 वी घटना आहे. अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी कार्यकर्ते वनविभागाकडे नियमावली जरी करावी असी मागणी करत आहेत. आणि त्याचबरोबर असे स्टंट करणारे आणि त्यांचे फोटो काढून अपलोड करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी असी मागणी केली आहे.
नवी मुंबईतील सीबीडी बेलापूरचा रहिवासी सोमनाथ म्हात्रे चा २ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. सीबीडी बेलापूरमध्ये एका कार मध्ये साप असल्याची माहिती मिळताच सोमनाथ तेथे गेला. पण सापाला वाचवल्यानंतर तो कोब्राला घेऊन दुसऱ्या ठिकाणी गेला. तिथे त्याने कोब्राच्या डोक्याला कीस करण्याचा प्रयत्न केला पण अचानक मध्ये कोब्रा त्याचा छातीला चालवला.
त्यानंतर त्याला नवी मुंबई च्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल गेल. तिथे त्याच्यावर पाच दिवस उपचार सुरु होते. मात्र अखेर त्याचा मृत्यु झाला. सोमनाथ ने आतापर्यंत १०० पेक्षा अधिक सापांना वाचवल होत. या आधी देखील कोब्रा ला कीस करणाऱ्या साताऱ्यातील एका सर्प मित्राचा मृत्यू झाला होता.