Team Khulasa

नालासोपारा: बहुजन विकास आघाडी, रांगडे जिम्नॅशियम आणी पालघर डिस्ट्रिक बॉडी बिल्डीर्स आणी फ़िटनेस असोसिएशन च्या वतिने नालासोपारा येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आमदार श्री दोन हजार सतरा या शरिर सौष्टव स्पर्धेत डोंबिवलीचा अक्षय मोगरकर मानकरी ठरला आहे. या स्पर्धेत सात जिल्ह्यातील एकशे ऐंशीच्या वर स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता.

बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक निलेश देशमुख आणी माजी नगरसेवक परेश पाटील यांच्या पुढाकारातुन रविवार पाच फेब्रुवारी रोजी नालासोपारा पुर्व के.एम.पी.डी शाळेत आमदार श्री दोन हजार सतरा शरिर सौष्टव या स्पर्धेचे पहिल्यांदाच आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी पालघर डिस्ट्रिक बॉडी बिल्डीर्स आणी फ़िटनेस असोसिएशन व पश्चिम ठाणे बॉडी बिल्डिंग अन्ड फ़िटनेश असोसिएशन शरिर सौष्टव संघट्नेच्या मान्यतेने ही स्पर्धा घेण्यात आली होती. पश्चिम ठाणे, पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, नवि मुंबई, रायगड, या सात जिल्ह्यासह नेव्हीचे बॉडी बिल्डर्स अशा एकशे ऐंशी स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. पंचावन ते नव्वद वजनी गटातील स्पर्धकांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली आहे. या वयोगटात एकुन आठ गट तयार केले होते. पंच्याऐंशी वजनी गटातील आरोग्य साधना या जिमच्या अक्षय मोगरकर यांनी यंदाचा आमदार श्री हा किताब पटकविला आहे. तर बॉडी फ़ॅक्स या जिमचा संकेत भरम हा बेस्ट पोझर राहिला. या स्पर्धेत इंडीयन नेव्हीचे बॉडी बिल्डर्स हे विशेष आकर्षण होते. या स्पर्धेसाठी आ.क्षितीज ठाकुर, माजी महापौर राजिव पाटील, नगरसेवक आरुण जाधव, यांच्यासह अन्य जणांची प्रमुख उपस्थीती होती.