Team Khulasa

नायगांव: वसईतील एका मुस्लीम इसमाला घर नाकारण्याचं प्रकरण ताजं असतानाच, वसईतील नायगांव परिसरात एका सोसायटीने वर्तणुकीचं कारणं पुढे करतं एन.ओ.सी. देणं नाकारलं आहे. उपनिबंधकाने लिखीत स्वरूपात एन.ओ.सी. देण्याचे आदेश देवूनही सोसायटी त्या इसमाला एन.ओ.सी. देत नाही. एन.ओ.सी. दिलं नसल्यानं बॅंकेतून चेक त्या इसमाला मिळण्यास अडचण येत आहे.

आपल्या हक्काच्या घरासाठी ४५ वर्षाचा किशोर राभाडिया हा संघर्ष करताना दिसून येतोय. नायगांव येथील रश्मी पिंक सिटी येथे तिस-या मजल्यावर किशोर राभाडिया यांनी आपली पत्नी सुप्रिया राभाडिया हिच्या नावे नोव्हेंबर २०१६ रोजी रुम विकत घेतला. रुम घेण्यासाठी खाजगी कर्ज काढून, रजिस्ट्रेशन करून घेतलं. आणि बॅंकेत लोनसाठी अर्ज ही केलं. आता लोन पास झालयं. बॅंकेतून दोन हप्ते ही कट झाले आहेत. माञ बॅंकेचा चेक त्याच्या हाती अजून आला नाही. कारण सोसायटीचं एन.ओ.सी. अजून किशोर यांना मिळालं नाही. किशोरला सोसायटी गेली दोन महिने एन.ओ.सी.चं देतच नाही कारण एवढचं की सोसायटीनं वर्तणुक चांगली नसल्याच्या सबबी खाली एन.ओ.सी. देण्याच त्याला टाळल आहे.

राकेश यांनी सोसायटीचे सर्व मेन्टेन्स आणि कागदपञे पुर्ण केली आहेत. आपल्यावर होणा-या अन्यायाची कैफीयत त्यांनी वसईच्या उपनिबंधाकडे लेखी स्वरूपात मांडली ही आहे. उपनिबंधकांनी सोसायटीस राकेश याची बाजू ग्राह्य धरून, सोसायटीला एन.ओ.सी. देण्याचे आदेश ही दिलेत. माञ सोसायटीची ऐवढी मगरूरी वाढलीय की, उपनिबंधकाच्या आदेशाला ही केराची टोपली या सोसायटीने दाखवली आहे.

आपल्या अधिकाराचा चुकीचा वापर करत काही, को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील पदाधिकारी नवीन सदस्यांना ञास देण्याच्या घटना तशा नव्या नाहीत. माञ असं असून ही या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत हे विशेष. यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाची अमंलबजावणी उपनिबंधकांनी काटेकोरपणे करावी हे एकच उपाय. सध्या सोसायटीचा एक ही पदाधिकारी कॅमे-यासमोर आपली बाजू मांडण्यास तयार नाही.