Team Khulasa

वसई: वसई रोड रेल्वे स्थानकात मॅराथान धावपट्टुचा रेल्वेतुन पाय घसरुन मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लोकेश वाघमारे असे मृत्यु झालेल्या धावपट्टुचे नावे आहे. वडोदरा येथील मॅराथान संपवुन तो स्वराज्य एक्सप्रेसने मुंबईला येत होता. त्याला वसईला उतरायचे होते परंतु स्वराज्य एक्सप्रेसला वसईला थांबा नव्हता. पण वसई रोड रेल्वेस्थानकात रेल्वे धिम्या गतीने चालत होती. आणि याच संधीचा फ़ायदा घेवुन तो वसई रोड रेल्वे स्थानकात उतरण्याचा प्रयत्न करित असतांना त्याचा पाय घसरुन पडला आणी त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने लोकेशच्या कुटुंबियांवर मात्र दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

वसईतील गौराईपाडा येथे राहणारा लोकेश वाघमारे. तो वसईतील न्यु इंग्लिश स्कुल मध्ये शिक्षण घेत होता. तर गौराई पाडा येथील दुर्गा नगर येथील चाळीत तो आपल्या कुटुंबिया समवेत राह्त होता. लोकेशचे वडील मागील दहा वर्षापासुन मनोरुग्ण झाले असल्यामुळे ते घरातच पडुन असतात. आई घरकाम करुन संसाराचा गाडा चालवत आहे. त्याला दोन बहिणी आहेत. एकीचे लग्न झाले पण तीचाही पती मयत झाल्याने ती आपल्या दोन मुलांना घेवुन आई वडीलांकडेच राह्ते तर एक बहिण अविवाहीत आहे. वडीलांच्या नंतर घरात आई आणी लोकेश हे दोघेच कमविते होते. घरची परिस्थीती अतिशय हलाकीची असतांनाही आणी एका चाळीत राहुन लोकेशने राष्ट्रीय खेळाडु होऊन आपल्या गरिबीवर मात करण्याचे स्वप्त ठेवले होते. लोकेशने वसई-विरार सह मुंबई आणी मुंबई बाहेर अनेक मॅराथान स्पर्धेत भाग घेवुन पारितोषक मिळविले आहेत. दहा बाय पंधराच्या रुम मध्ये राहुन लोकेशने आपले धावण्याचे स्वप्न रंगविले होते. पण नियतीने लोकेशच्या जिंदगवरच घाला घातला आणी त्याचा रेल्वे अपघातात मृत्यु झाला आहे. लोकेशच्या मृत्युची बातमीने त्यांचे कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे घरातील मेडल आणी ट्राफ़ि पहात त्याची आई त्याच्या आठवणींना उजाळा देत आहे. तर तो लोकेश मॅराथान स्पर्धेसाठी जातांना आपल्या बहिणीला कशा पध्दतीने हट्ट करायचा या आठवनीनेही त्याच्या बहिणीचा उर दाटुन येत आहे. मागील दहा वर्षापासुन मनोरुगण असणा-या वडिलांना मात्र लोकेशच्या मृत्युची खबरही मिळाली नाही. ते त्याच्या फ़ोटोसमोरच झॊपतात पण त्यांना हे आता माहीत नाही की आपला एकुलता एक मुलगा आता या जगात नाही.

आपल्या परिस्थीतीवर मात करुन लोकेशला राष्ट्रिय पातळीवर त्याला धावपट्टू म्हणून नाव कमवायचे होते. दुर्गा नगर सोसायटीतील लहान मुलांपासुन, महिला आणी मित्रपरिवारात लोकेश हा सर्वांच्या जवळचा होता. तो जेंव्हा स्पर्धेसाठी जायचा तेंव्हा सर्वांना बोलुन जात असे. आणी स्पर्धे मध्ये मेडल घेवुन आला की, सर्वांना तो मेडल दाखव असे, त्याचा अतिशय स्वभाव मन मिळावु होता. आपल्या गरिबीतुन त्याला वडीलांचे स्वप्न साकार करायचे होते अशा प्रतिक्रिया त्याच्या मित्र परिवाराने दिल्या आहेत.

वडोदर येथील मॅराथान स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविल्याच्या नंतर लोकेशला आपल्या आईला भेटण्याची घाई सुटली होती. पण तो ज्या स्वराज्य एक्सप्रेसने येत होता त्या एक्सप्रेसला वसई रोड रेल्वेस्थानकात थांबा नव्हता. पन याठिकाणी रेल्वे धिमी झाली आणी याच संधीचा फ़ायदा घेवुन तो उतरण्याचा प्रयत्न करित होता. पण नियतीला ते मान्य नव्हते. आणी याचवेळेत रेल्वेने गती पकडली आणी त्याचा पाय घसरुन तो प्लॅटफ़ार्मवर पडला. या सर्व घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. पण घरातील एकमेव कमविता मुलगा, एक खेळाडुचे स्वप्न जगातल्या आठवनीही त्याला साथ दिली नाही. आणी त्याचा रेल्वे अपघातात मृत्यु झाला आहे.