IMG-20170209-WA0008

Team Khulasa

भाईंदर : भाईंदर पश्चिमेकडील सुभाषचंद्र बोस मैदान येथील अवैध माती भराव करून तिवरांची झाड़े कत्तल केल्याप्रकरणात भाईंदर पोलिस ठाण्यात मिरा भाईंदर मनपा कार्यकारी अभियंता दीपक खांबित, ठेकेदार प्रकाश कांबळे सहित चार जणांवर पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५ व १९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मौजे भाईंदर येथे सर्वे क्रमांक २२९, २३० सुभाष चंद्र बोस मैदान येथील या शासकीय जागेवर माती भरावाचे काम सुरु होते. ज्यामुळे त्या जागेवर असलेल्या तिवरांची झाड़े नष्ट होत होती. त्याठिकाणी डंपरमधून माती आणून भराव केला जात होता. या घटनेची माहिती मिळताच मंडल अधिकारी लक्ष्मण पवार यांनी भाईंदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. भाईंदर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माती भराव करत असलेला एक डंपर ताब्यात घेतला आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५ व १९ नुसार मिरा भाईंदर मनपा कार्यकारी अभियंता दीपक खांबित, ठेकेदार प्रकाश कांबळे, गाड़ी मालक विक्रम शिंदे ,चालक संतोष नागरे यांचाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र अजून पर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले.