Team Khulasa

वसई: वसईच्या एका २४ वर्षीय तरुणाची साउथ आफ्रीका मधील जमायका येथे गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. राकेश तलरेजा असं या युवकाच नाव आहे. जमायकामध्ये एका दुकानात तो काम करत होता. तेथील एका ग्रुपने त्याच्यावर घरात गोळीबार केला आहे. या गोळीबारात दोन मिञ ही जखमी झाले आहेत. त्याच्या हत्येनं वसईत सध्या शोककळा पसरली आहे.

ज्योती प्रकाश तलरेजा आणि प्रकाश तलरेजा यांचा २४ वर्षाचा मुलगा राकेश तलरेजा याच्यावर विदेशात गोळीबार झाला आहे. त्यात त्याचा म़ृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी सव्वा आठच्या दरम्यान राकेशचे भावजी विकी लखाणी याच्या मोबाईलवर रोकेशच्या बॉसचा फोन आला. आणि त्याने ही दुःखद घटना सांगितली. एक ग्रुप राकेश कडून जबरदस्ती मोबाईलची मागणी करत होता. त्यातच या ग्रुपने राकेश आणि त्याच्या मिञांवर गोळीबार केला. यात राकेशचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची वार्ता त्याने कळवली. जमायका च्या वृत्तपञाच्या बातमीवरून, ९ फेब्रुवारीला सायंकाळी ७ च्या दरम्यान ही घटना घडली आहे. राकेश आणि त्याचे मिञ जमायकामधील चेरी गार्डन, किंगस्टोन ८, येथे घरात होते. त्याचवेळी चोरीच्या उद्देशाने आलेल्या चौघांनी राकेशच्या छातीवर गोळी मारली आणि दोघां मिञांच्या पायावर गोळी मारली.
राकेशच्या मृत्यूच्या बातमीने घरातील सर्वांवर दुःखाचं डोंगर कोसळला आहे. राकेश हा १४ वीत शिकत होता. माञ घरची आर्थिक स्थिती तशी बेताची. त्यात जमायका मध्ये दुकानात काम करण्याची ऑफर आली. आणि त्याने दोन वर्षापूर्वी जमायका गाठलं. राकेशचा भाऊ महेश तलरेजा ही विदेशात नोकरी करतो. तो साउथ अमेरिकामध्ये आहे. तो एप्रिल मध्ये भारतात येणार होता. आपल्या आई-वडीलांना जगातील सर्व सुख देण्याच्या उद्देशाने निघालेला हा राकेश त्याची अशी बातमी येईल, याच्यावर घरच्यांचा अजून विश्वासच बसतं नाही.