vasai-virar
Team Khulasa

वसई: वसई किनाऱ्यावर अनधिकृत बिल्डरांनी आयोजित केलेल्या सांग्रसंगीत पार्टीत मद्यधुंध अवस्थेत नाचनाऱ्या महापालिकेतील ठेके पद्धतीने काम करणाऱ्या १२ अभियंत्यांविरोधात पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी निलंबनाची कारवाई केली आणि या निमित्याने पालिका कर्मचारी आणि चाळ माफिया यांच्या बरोबर असणारे आर्थिक संबंध चव्हाट्यावर आले गंभीर बाब म्हणजे हे अश्या वेळे आले जेव्हा पालिका अनधिकृत बांधकामावर नियंत्रण आण्याचा दावा करत आहे. पण आता निलंबित अभियंता यांचा मोरक्या खानवलकर काही त्याच्याकडे असणारे रोजंदार पत्रकाराला हाताशी धरून खाजगी पार्टी असल्याचा आव आणून पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांच्यावर दबाव आणत आहे.

विशेष म्हणजे ज्या बिल्डरांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करायची त्याच बिल्डरसोबत इंजिनियर पार्टीत असे बेधुंद होऊन नाचत होते. ह्या पालिकेत काम करणाऱ्या इंजिनियर ला कोणी हि पार्टी करू नका असे सांगितले नाही आहे किंवा पार्टीमध्ये मद्द धुंध अवस्थेत नाचणे हा गुन्हा आहे असे देखील म्हणणे नाही. पण आपण कोणासोबत कुठे पार्टी करत आहोत याच भान नक्कीच त्यांना राखायला हव होत. ज्या बिल्डरांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करायची जवाबदारी त्याच्या वर आहे त्याच बिल्डरसोबत जर असे बेधुंध होऊन जर हे इंजिनियर नाचत असतील तर लोकांचा पालीकेवरचा विश्वास कसा उडणार नाही? असा सामान्यांच्या मनात हा प्रश्न आहे . या आधी हि मुंबई पोलीस दलातील काही अधिकारी गँगस्टर च्या पार्टीत हजर राहिले म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती तर मीरा रोड मध्ये एक पोलीस उपनिरीक्षक मित्रा सोबत लेडीज बार मध्ये बसला असल्याचा विडिओ समोर आले होते त्याला हि निलंबित करण्यात आले होते तर या प्रकरणात वसई विरार महानगरपालिका आयुक्त यांनी अभियंतावर जी कारवाई केले ती अपेक्षित होती.
इथे प्रश्न पार्टी करण्याचा किंवा पार्टीत नाचण्याचा नसून आपण कोण आहोत, आपली जवाबदारी काय याचा आहे. ज्या अनधिकृत बांधकामा वर या अभियंत्याची कारवाई करण्याची जवाबदारी आहे त्याच अनधिकृत बांधकामाच्या बिल्डर बरोबर मद्यधुंध अवस्थेत हे जर नाचत असतील तर याच बिल्डर च्या अनधिकृत बांधकामला अभियंता आश्रय देतात हा आरोप कुठे ना कुठे सिद्ध होत आहे. ज्या अभियंता स्वरूप खानवलकर याच्या वाढदिवस होता त्याचा भ्रष्ट कारभार हा पालिकेत नवीन नाही . जेव्हा अभियंता स्वरूप पेल्हार विभागात होता तेव्हा त्याच्या गॉड मदर स्मिता भोईर यांच्या आशीर्वादाने आणि त्याचा पाटनर अभियंता नरेंद्र संखे यांच्या सोबतीने पेल्हार विभागात अनधिकृत बांधकामाचे जंगल उभे केले. अफाट माया यांनी कमवली असा आरोप आहे कारवाई च्या नावाने भितींना भोक पाडायचे आणि सेटलमेंट करायची असा यांचा धंदा होता या दोघांच्या असंख्य तक्रारी झाल्या पण कारवाई तर सोडा स्वरूप खानवलकर याला मुख्य अभियंता बनवण्यात आले आणि अखेर हि अभियंतांची हफ्तेखोर टोळी चा नंगा नाच समोर आला आता हे त्याच्याकडे असणारे रोजंदार पत्रकाराला हाताशी धरून खाजगी पार्टी असल्याचा आव आणून पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांच्यावर दबाव आणत आहे.