vesa

Hanif Patel

वसई: वसई पश्चिम येथील आनंद नगर जवळील परिसरात गेल्या काही वर्षापासून वेश्या व्यवसाय सुरु आहे. आणि याचा त्रास तेथील सामान्य महिलांना सहन करावा लागत आहे. या भागात मध्ये बार देखील आहेत. आणि दारू पिऊन आंबट शोकीन लोक तेथून येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना छेडतात. या मुळे वसई मध्ये छेडछाडीचे प्रकार वाढले आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या सामान्य स्त्रियांना देखील त्याच नजरेने पहिले जाते. तेथे राहणाऱ्या रहिवासांनी त्या विरोधात आवाज उठवला होता. पण अद्यापहि याच्या वर काही कारवाई झाली नाही आहे. असे का घडले असेल?

गेल्या काही वर्षापसून आनंद नगर रेल्वे फलाट क्रमांक १ ते एस.टी बस डेपो ऋषिकेश हॉटेल पर्यंत शरीर विक्री करणाऱ्या महिला अश्लील हावभाव करीत उभ्या असतात. आनंद नगर हा भाग स्टेशन जवळ आहे आणि त्यामुळे रात्री येणाऱ्याप्रवासांना या त्रासाला सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे आनंद नगर भागातील काही सोसायटी मधील पदाधिकाऱ्यांनी अर्जाद्वारे वसई पूर्व, वसंत नागरी पोलीस स्टेशन ला तक्रार देखील केली आहे.
वसई मधील प्रवासी लॉज, मंजुळा लॉज, स्वप्नील लॉज आणि रेनबो लॉज या लॉज मध्ये हे व्यवसाय बिनदिक्कत सुरु आहेत. त्यामुळे नजीकचे रहिवासी त्याचसोबत रत्याने जाणारे पादचारी आणि मुख्यत: महिला व मुले यांना मोठ्या प्रमाणात याचा त्रास उद्भवत आहे. यावर लवकर कारवाई करावी असे सोसायटी मधील सर्वांचे म्हणणे आहे. जवळपास या गोष्टीला ५ ते 6 वर्ष होऊन गेली आहेत आणि तक्रार करून देखील कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न उभा राहिला आहे.
माणिकपूर पोलीस स्टेशन ला अनेक वेळा तक्रार करण्यात आली पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले.