gavde

Team Khulasa
नालासोपारा:शिवसेनेचे नगरसेवक धनंजय गावडे यांची नाहक बदनामी करण्याचे सत्र सध्याबहुजन विकास आघाडीतील काही असंतुष्ट मंडळीने सोशल मीडियावर सुरु केले आहे. काही Facebook Account, What’s App Group तयार करून त्याद्वारे बहुजन विकास आघाडीतील काही लोकांनी धनंजय गावडे यांच्या विरोधात बदनामी कारक पोस्ट तयार करून सोशल मीडियाद्वारे त्या पसरविल्या जात आहेत. या विरोधात धनंजय गावडे यांनी पालघर येथे सायबर सेलकडे तक्रार दाखल केली असून लवकरच गुन्हा दाखल होऊन संबंधितांवर कारवाई होणार आहे असे धनंजय गावडे यांनी सांगितले.

शिवसेनेचे नगरसेवक धनंजय गावडे यांनी सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या भ्रष्ट कारभारा विरोधात सुरु केलेला तीव्र संघर्ष, अनधिकृत बांधकाम करणाऱ्या धनदांडग्या व्यावसायिकांना बसवलेला चाप, प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात उठविलेला आवाज यामुळे सत्ताधारी बहुजन विकास आघाडीमध्ये धनंजय गावडे यांच्या बद्दल प्रचंडमोठ्या प्रमाणात दरार निर्माण झाला आहे.असे गावडे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे धनंजय गावडे यांचे शिवसेनेत वाढत असलेले प्रस्थ, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांच्या प्रती निर्माण झालेला विश्वास यामुळे त्यांचे वाढत असलेले वर्चस्व विरोधकांच्या मनामध्ये खुपत आहे असे धनंजय गावडे यांचे म्हणणे आहे.

नगरसेवक धनंजय गावडे यांच्यावर बिनबुडाचे खोटे -नाटे गुन्हे दाखल करून या ना त्या मार्गाने त्यांना अडकवून त्यांचे राजकीय अस्तित्व संपविण्यासाठी जणू सर्वच पातळीवर कंबर कसली जात आहे. असे गावडे यांचे मत आहे. कोणत्याही प्रकारची शहानिशा नकरता, स्पष्टीकरण न घेता, सत्यता पडताळणी न करता धनंजय गावडे यांच्यावर बिनबुडाचे खोटे गुन्हे दाखल करण्याचे सत्रसध्या सुरु आहे. याविरोधात नगरसेवक धनंजय गावडे यांनी सर्व स्तरावर सविस्तर तक्रारी केल्या असून लवकरच संबंधितांवर कारवाई होणार आहे. असे धनंजय गावडे यांनी एका प्रसिद्ध पत्राद्वारे सांगितले आहे.