train

Team Khulasa

मुंबई: मध्य रेल्वेने भारतीय पहिली रेल्वे रुग्णवाहिका तयार केली आहे. आरोग्याच्या शिबिरासाठी किंवा अपघाताच्या वेळी हि रुग्णवाहिका वापरात येणार आहे. नाशिक येथे दीड वर्षांपूर्वी झालेल्या कुंभ मेळ्याच्या निमित्ताने हि रुग्णवाहिका तयार करण्यात आली होती.

चार डब्बे पूर्णपणे वातानुकुलीत, जवळपास ५० रुग्णांची सुविधा, सर्व प्रकरची तपासणी सुविधा आणि छोट्या शस्त्रक्रिया करण्याची सुविधा या रुग्णवाहिकेत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत याचा फायदा होईल, असे म्हणणे मध्य रेल्वे चे आहे.

लोणावळा येथे गुरुवारी झालेल्या रेल्वेच्या आरोग्य शिबिरासाठी हि रुग्णवाहिका कल्याणहून लोणावळ्याला नेण्यात आली. रेल्वे अपघाता सारख्या परिस्थितीत जखमींना ताबडतोब मदत पोहचवणे त्याचप्रमाणे रुग्णावर कमीत कमी वेळात उपचार करण्यात येतील असे हा रेल्वे रुग्णवाहिकेचे फायदे आहेत.