Team Khulasa

औरंगाबाद : औरंगाबादमधील देवगिरी किल्ल्याच्या डोंगराला अज्ञाताने आग लावली. देवगिरी किल्ल्याला जवळील दौलतागडच्या घाटात अज्ञाताने आग लावली.

आगीच्या घटनेनंतर सकाळी चार वाजता अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रणात मिळवण्यात यश आले.

अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात असून, याआधीही या जंगलात वारंवार आग लावण्याचे प्रयत्न झाले आहेत. यावेळेस सुदैवाने आग पसरली नाही, त्यामुळे जंगलातील जीवितहानी टळली.
आग कुणी लावली आणि आगीचं कारण काय, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.