Team Khulasa

विरार: विरारची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, तेथे सुरक्षा देखील वाढवायची गरज निर्माण झाली आहे. चोरांचा सुळसुळाट वाढत असल्याचे लक्षात येत आहे. दरोडा, लुटपात यांसारखे प्रकार वसई विरार मध्ये वाढत असल्याचे दिसून येत आहे. विरार पूर्वेला असणाऱ्या लालन या शोरूम मध्ये चोरीचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.
विरार पूर्वेला अगदीच रोडवर लालन हे शोरूम आहे. या शोरूम मध्ये २९ जुलै ला रात्री सुमारे २ वाजता तीन भामट्यांनी चोरीचा प्रयत्न केला असून टाळे तोडल्याचे समजले आहे. परुंतु शोरूमला काच असल्यामुळे त्यांना शोरूम मध्ये शिरता आले नाही. त्यामुळे शोरूम मधून त्यांना काहीच चोरता आले नाही आणि त्यामुळे शोरूमचे नुकसान झाले नसल्याचे हरीश याने सांगितले. हरीश हा लालन या दुकानात काम करत असल्याचे समजले आहे. दुकान सकळी 9 ला जेव्हा उघडण्यासाठी आले असता दुकानाचे टाळे तोडल्याचे दिसले व त्यावरून चोरीचा प्रयत्न झाला असल्याचे उघडकीस आले. असे हरीश यांनी सांगितले. या सर्व प्रकारची पोलीस स्टेशन ला तक्रार केली असून पोलिसांनी जागेचा पंचनामा केला असून घडलेला प्रकार हा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. पोलीस सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या चोरांचा तपास करत आहेत.
विरार वसई मध्ये चोर चोरी करून फरार होत असल्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पोलिसांनी आपली गस्त वाढवावी व या चोर्यांना आळा घालण्याचे प्रयत्न करावे अशी मागणी सामन्य जनता पोलिसांना करत आहे. स्वकष्टाने कमवलेले असे चोरांनी आयते घेऊन जाणे खूपच दु:खद घटना आहे. वाढत्या महागाई मुळे कदाचित चोर्यांचे प्रमाण वाढले आहे असे दिसून येते.