Team Khulasa

वसई: विरार- वसई ला पाणीपुरवठा करणारी धरणे भरली असून आता वसई करांनी सुटकेचा नी:श्वास सोडला आहे. सूर्या प्रकल्पाचा टप्पा क्रमांक 3 ते ३५ दशलक्ष पाणी शहरात आल्याने शहराल आता १६५ दशलक्ष लिटर पाणी मिळू लागले आहे. दोन वर्षे पुरेल इतका पाणी साठ धरणामध्ये असल्याने वसईकरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे. शहरातील जलकुंभ प्रथमच भरून आले आहेत.
वसईतील पेल्हार धरणातून १० दशलक्ष लिटर पाणी, उसगाव धरणातून २० दशलक्ष लिटर पाणी, पापाडखिंडी धरणातून १ दशलक्ष लिटर पाणी आणि सूर्य प्रकल्पातून १०० दशलक्ष लिटर पाणी साठले आहे. पेल्हार धरण न भरल्यामुळे थोडी चिंता होती मात्र पावसाच्या दमदार हजेरीने पेल्हार धरण देखील पूर्ण भरून वाहू लागले आहे.
धमणी धरणाचे पाणी सूर्या प्रकल्प म्हणून ओळखले जाते. हे धरण ७८ टक्के भरले आहे. अ धरणातील अतिरिक्त पाणी सोडण्यात येत आहे. करणा जर पाणी जास्त झाले तर आजूबाजूच्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो. २ वर्ष हे पाणी पुरेल इतके आहे असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.