Team Khulasa

नालासोपारा: नालासोपारा पूर्व येथील संतोष भवन मध्ये एका पतीने आपल्या पत्नीचे हात व मुंडके कापून निर्घृण हत्या केली. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी पती अजय ला अटक केली आहे.
नालासोपारा पूर्वे ला संतोष भवन परिसरातील शर्मा वाडी येथील संजय यादव चाळीत अजय आपल्या पत्नी सरोजा देवी आणि दोन मुलांसोबत राहत होता अजय हा रिक्षा चालक आहे. अजय हा आपल्या पत्नी सरोजा देवीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने या दोघांमध्ये नेहमी खटके उडत असत. गुरुवारी रात्री उशिरा दोघांचे कडाक्याचे भांडण झाले, या भांडणात त्याने तिचे दोन्ही हात व मुंडके छाटून एका बादलीत ठेवले. त्यानंतर अजय आपल्या मुलांना घेऊन वसई ला आपल्या वडिलांकडे गेला.
मुलांना घेऊन पहाटेकसा काय आला म्हणून वडिलांनी विचारले असता अजयने मुलांना आठवण आली म्हणून घेऊन आलो असे सांगितले व पत्नी घरी आहे असे देखील बोला. पण, काही तरी गडबड असल्याचे वडिलांना समजले, म्हणून त्यांनी मुलांकडे चौकशी केली असता मुलांनी अजयने तिची हत्या केल्याचे आजोबांना सांगितले. हा प्रकार ऐकूण धक्का बसलेल्या आजोबांनी घरी जाऊन पहिले असता सर्व प्रकार त्यांना समजला. त्यानंतर त्यांनी तुळींज पोलिसांना याबाबत माहिती दिली.