Team Khulasa

वसई: वाहतुक विभागाच्या धडक कारवाईमुळे मागील काही वर्षात वाहतुकीला शिस्त लागेल, अशी आशा होती. मात्र पालिका क्षेत्रात जागोजागी सिग्नल यंत्रणा असून देखील बेशिस्त वाहनचालकांचे बेदरकर वाहने चालवणे, तसेच वाहतुकीचे नियम धाब्यावर बसण्याचे प्रकार काही केल्या कमी होत नसल्याने वाहतूक विभागाला कारवाई चे शस्त्र वारंवार हाती घ्यावे लागत आहे. नुकतेच वाहतूक विभागाने अशा पद्धतीने वाहतुकीचे नियम डावळणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईची दंडुका उगारला आहे. जुलै महिन्यात ५२५ वाहनांवर कारवाई केली असून तब्बल ९५ हजारांचा दंड वासून करणायत आला आहे.
वसई विरार महानाग्पालिका प्रशासनाने महापौर प्रविण ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १६ ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मात्र वसईतील वाढत्या वाहनांनपुढे हि सिग्नल यंत्रणा निष्प्रभ ठरल्याचे दिसून आल्याने वाहतूक कोंडीचा बोजवार उडाला आहे. आधीच वाहतूक कोंडीचा ताप आणि त्यात बेशिस्त वाहनचालकांचा मनस्ताप यामुळे वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. वाहतूक नियम धाब्यावर बसवणाऱ्या काही बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक विभागाने कारवाईचादंडुका उभारला असून एका महिन्यात तब्बल ५२५ वाहनांवर करवाई करून ९५ हजारांचा दंड वसूल केला.
सध्या वाहतूक विभागाकडे मनुष्य बळ कमी असल्यामुळे वाहतुकीवर देखरेख ठेवण्यासाठी अनंत अडचणी येत आहेत. वाहतूक विभागाला मदत करण्यासाठी पालिका प्रशासनातील कर्मचारी देण्यात यावेत यासाठी अनेकवेळा पत्र व्यवहार करून देखील पालिकेने कर्मचारी न दिल्याने वाहतूक विभागाला वाहतुकीवर द्केह्रेख करण्यासाठी कसरत करावी लागत आहे.