Team Khulasa

वसई: नारळीपौर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण एकत्र आल्याने वसई तालुक्यात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. दरम्यान सायंकाळी दर्याराजाला मदार ठेवून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कोळी बांधवांनी दर्यालासोन्याचा नारळ अर्पण केला आहे व आपल्यावर कृपा दृष्टी ठेव अशी प्रार्थना देखील केली आहे.
वसई पश्चिमेकडील कोळीवाडा, नायगाव, अर्नाळा, खोचीवडा, रानगाव या ठिकाणी अनेक कोळी बांधव आहेत त्यांनी हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला. या ठिकाणी बँडबाजा आणि ढोल पथकांच्या आवेशात मिरवणुका काढून दर्याराजाला ओवाळण्यात आले. तर दुसरीकडे रक्षाबंधनचे औचीत्यसाधून नात्यांतील मर्म रेशमी धाग्यांत गुंफले गेले.
१ ऑगस्ट पासून मासेमार्यांनी बोटी समुद्रात उतरवल्या असल्या तरी आज खास हिंदू परंपरेनुसार येथील बंदरात बोटीची पूजा अर्चना करण्यात आली. तसेच समुद्राला मानाचा नारळ वाहून मागण मागून मच्छीमार बांधवांनी आपापल्या बोटी समुद्रात उतरवल्या. दोन अडीच महिन्या नंतर मासेमारीसाठी मच्छीमार वर्ग तयार झाल्याने त्यांच्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. मात्र सध्या श्रावण महिना असल्याने मच्छीची विक्री हि कमीच होणार आहे.