Team Khulasa

नालासोपारा: नालासोपारा मध्ये ४५ जणांच्या बँक खात्यातून लाखो रुपयांची रक्कम लंपास करण्यात आल्यची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात १० आणि नालासोपारा पोलीस ठाण्यात ३५ जनानी गुन्हा नोंदवला आहे. कार्ड क्लोनिंग करून हा गुन्हा केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
४ ते ७ ऑगस्ट या कालावधीत नालासोपारा मध्ये राहणाऱ्या ४५ नागरिकांच्या बँक खात्यातून अचानक पैसे गायब झाले आहेत. या नागरिकांच्या खात्यातून एटीएम कार्डद्वारे ४ हजारापासून ५० हजारांपर्यंत रक्कमा काढून घेण्यात आल्या आहेत. पैसे काढल्याचा एसएमएस आल्यानंतर हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आला आहे. हे सर्व पैसे दिल्ली मधील एटीएममधून काढले आहेत.
नालासोपारा पोलीस ठाण्यात ३५, तर तुळींज पोलीस ठाण्यात १० नागरिकांनी तक्रारी नोंदवल्या नंतर याबबत पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. कोटक, एचडीएफसी, आयसीआय, अभ्युदय, सारस्वत, बॅसीन कॅथोलिक, एसबीआय आदी अशा नामांकित बँकाच्या एटीएम मधून हे पैसे लंपास करण्यात आले आहे.