Team khulasa

वसई पश्चिमेत २ रुपयांनी वाढले रिक्षा भाडे; प्रवाशांमध्ये नाराजी

Team Khulasa

वसई: वसई पश्चिमेकडील रिक्षाने प्रवास करणाऱ्या रिक्षा प्रवाशांना भाववाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. दोन रुपयाने रिक्षाचे भाडे वाढवण्याचा निर्णय गुरुवारी रिक्षा संघटनांनी घेतला आहे. या भाडे वाढीमुळे आठ रुपयांऐवजी दहा रुपये प्रवाशांना द्यावे लागणार आहेत.
वसई पाचीमेकडून स्टेला, पारनाका, बाभोळा, माणिकपूर अशा ठिकाणी शेअर रिक्षा जात्तात, तर इतर ठिकाणी स्पेशल रिक्षाने जावे लागते. या सर्व भाड्यात २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. २०१४ नंतर प्रथमच हि वाढ केली गेली आहे असे रिक्षा संघटनांनी सांगितले.
वसई व विरार च्या इतर भागांमध्ये या पूर्वी वाढ झाली होती, परंतु वसई पश्चिमेला ती वाढ झाली नव्हती, परंतु इंधनाचे वाढते दर, दुरुस्ती आणि देखभालीचा वाढणारा खर्च यामुळे हि भाडेवाढ करणे अटळ झाल्याचे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष विजय खेतले यांनी सांगितले. हि भाडेवाढ लांब पाल्याच्या भाड्यात झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ह्या भाडे वाढीमुळे आर्थिक फटका बसणार असल्याने प्रवाशांनी नारजी व्यक्त केली आहे.