Team Khulasa

वसई: वाहतूक पोलीसांना भर रस्त्यात मारहाण करणाऱ्या सलीम मेमन च्या माणिकपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या सलीम मेमेन ला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असून एका दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
वसई वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई काळू मुंडे हे सोमवारी पावती क्रॉस नाक्यावर कामावर होते. त्यावेळी त्यांनी एका दुचाकीस्वरास सिग्नल चे उल्लंघन केल्यामुळे हटकले. त्यावेळी विरुद्ध दिशेला असणारा सलीम मेमन हा मुंडे यांच्या अंगावर धावून गेला व त्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. मेनेन याला त्यावेळी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून सोडून दिले होते. मात्र गुरुवारी या मारहाणी ची विडीओ समजमाध्यमांवर प्रसारीत झाली. आपल्यावर कारवाई होईल या भीतीने मेमन याने पळ काढला होता. मात्र माणिकपूर पोलीसांनी त्याला गुरुवारी रात्री त्याला त्याच्या मोबाईल च्या ठावठिकाणा अरुण अटक केली. सरकारी कामात अडथला, पोलीस कर्मचार्याला शिवीगाळ व मारहाण, धमकी असे आदी गुन्हे त्याचावर दाखळ करण्यात आले आहेत.
वसई च्या सत्र न्यायालयात त्याला शुक्रवारी हजर केले गेले. त्याच्याकडून गुन्ह्याच्या वेळी असलेली मोटरसायकल हस्तगत करण्याचे बाकी असल्यामुळे पोलिसांनी वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली होती. हि मागणी मान्य करत न्यायालयाने आरोपी सलीम मेमन याला १२ ऑगस्ट पर्यत पोलीस कोठडी दिल्याचे या प्रकरणाचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी सांगितले.
आरोपी हा इस्टेट एजंट आहे. घटनेच्या दिवशी तो पत्नी व मुलासह मोटरसायकल वर होता. त्याचा काही संबंध नसताना तो वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालायला गेला.