Team Khulasa

नालासोपारा : नालासोपारा पुर्व प्रगती नगर, सेंन्ट्रलपार्क विभागात मुलभूत समस्यांचा बोजवारा ऊडाला आहे. रस्ता, विज, गटार, ड्रेनेजमधील घाणीचे साम्राज्य या मुलभूत समस्या सोडविण्यासाठी वसई विरार महापालिका, स्थानिक लोकप्रतिनिधी असमर्थ ठरत असल्यामुळे, महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतिने नालासोपा-यात बेमुद्दत अमरण ऊपोषण सुरु आहे. या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे तरीही महापालिका किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींनी साधी विचारपुसही केली नसल्याने आंदोलनकर्त्यात मात्र मोठा संताप व्यक्त होत आहे. जर प्रशासनाचे असेच धोरण असेल तर मनसेच्या वतिने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

हे आहे नालासोपारा पुर्व प्रगती नगर, सेंन्ट्रलपार्कचा परिसर, हा सर्व परिसर प्रभाग क्र. ३९ मध्ये येतो. या विभागातील मुलभूत समस्या सोडवाव्यात या मागणीसाठी मनसेचे विभाग अध्यक्ष सैनिक मांगले हे मागील पाच वर्षापासुन वसई विरार महापालिकेकडे पाठपुरावा करित आहेत. पण त्यांच्या मागण्यांना पालिका आणी स्थानिक लोक प्रतिनिधीकडुन केराची टोपली दाखवली जात असल्यामुळे १६ नोव्हेंबर पासुन त्यांनी प्रगती नगर येथील मुख्य रस्त्यावर अमरण उपोषण सुरु केले आहे. शिवम अपार्टमेंन्ट ते ओसवाल नगरी पर्यंतचा ३० मिटर रस्ता पुर्ण करावा, या रस्त्यावर जलवाहिनी अंतरुन स्थानिक रहिवाशांना नळ जोडणी द्यावी, जय मातादी चाळ येथील रहिवाशांना नळ कनेक्शन द्यावेत, प्रभागातील रस्त्यावर दिवाबत्तीची सोय करुन द्यावी, ३० मिटरच्या डीपी रोडवर आर. सी.सी. गटार बांधुन द्यावेत या मागणीसा्ठी हे उपो्षण सुरु आहे. शहरातील मुलभूत समस्या सोडवण्यासाठी सुध्दा अमरण उपोषण करावे लागत असेल तर वसई विरार महापालिका प्रशासनाचे मोठे अपयश असल्याचे आंदोलनकर्ते सांगत आहे.