Team Khulasa

विरार : भाजपचे जेष्ठ नेते वसंत वाणी यांनी शेर ए हिंद टिपू सुल्तान यांची तुलना जुल्मी राजाशी करून यांना शुरवीर घोषित करण्यास हरकत घेत जयंती साजरी करण्यास विरोध दर्शवला होता. त्यामुळे भाजपचे नेते यांनी मुस्लीम समाजाशी जाहीर माफी मागावी अन्यथा राज्यात ठिकठिकाणी आंदोलन छेडण्याचा इशारा बहुजन महापार्टीचे महासचिव शमशुद्दीन खान यांनी दिला होता. भाजपचे नेते वसंत वाणी यांनी अद्याप मुस्लीम समाजाशी माफी मागितली नसल्याने त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी मुस्लीम एकता मंडलचे पालघर जिल्हाध्यक्ष अल्ताफ सय्यद यांनी गोपचर पाडा विरार येथे मुस्लीम समाजातील लोकांना एकत्रा घेवून वसंत वाणी यांच्या पुतळ्याला काळीमा फासून पुतळयाचे दहन करण्याचे कार्यक्रम आयोजित केले होते. सदर कार्यक्रमात शेर ए हिंद टिपू सुल्तान झिंदाबाद चे नारे देत भाजपचे नेते मुर्दाबाद मुर्दाबाद असे नारे देण्यात आले व मुस्लीम एकता मंडळच्या पदाधिका¬यांनी पुतळयाला काळीमा लावून सदर पुतळयाचे दहन केले.

या कार्यक्रमात मुस्लीम एकता मंडळ चे पालघर जिल्हा अध्यक्ष अल्ताफ सय्यद बहुजन महापार्टी जिल्हाध्यक्ष लाला खान जिल्हा कार्याध्यक्ष बिलाल शेख मुस्लीम एकता मंडळ जिल्हा उपाध्यक्ष हुसैन सलीम शेख वसर्इ तालुका अध्यक्ष एस.आर.शेख उर्फ(जाजी), विरार शहर अध्यक्ष मुजफ्फर वहरा, विरार शहर उपाध्यक्ष अफसर शेख, युवा शक्ती एक्सप्रेसचे पत्राकार वसीम शेख, शाबुल्ला शेख, हाजी ग्फ्फूर शेख, मुस्ताक खान, सिराज शेख, अफरीन सय्यद, साबिया शेख, शमीम शेख, रशीदा शेख, नसीम जैदी व इतर कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. अखिल भारतीय जनहित सेवा संघचे अध्यक्ष रफीक अंसारी यांनी असे सांगितले की, सर्व मुस्लीम समाजातील लोकांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. भाजप सरकारने मुस्लीम समाजाला देण्यात आलेले आरक्षण रद्द केलेले आहे. शासनाच्या सोर्इ सुविधा मुस्लीम लोकांना मिळत नसल्याने मुस्लीम एकता मंडळ मध्ये सर्व मुस्लीम समाजातील लोकांनी एकत्रा येऊन शासनाच्या अत्याचाराविरूदध आवाज उठविणे गरजेचे आहे. तसेच भाजपचे नेते वसंत वाणी यांनी मुस्लीम समाजाशी जाहीर माफी न मागितल्यास जिथे दिसेल तिथे त्यांच्या तोंडाला काळीमा फासले जार्इल असे सांगितले. व भिवंडी तालुका अध्यक्ष बबन पडवळयांनी भिवंडी येथील मुस्लीम समाजातील लोकांना एकत्र घेवून वसंत वाणी यांची तुलना दगडाशी करून दगडाला यांचा फोटो लावून एक आनेख्या पदधतीने तलावात विसर्जन करून जाहीर निषेध केला.