Team Khulasa

वसई: रुम मध्ये झोपलेल्या मित्राने केवळ दार ऊघडले नाही, एवढ्याच कारणावरुन झालेल्या वादावादीत चक्क मित्रानेच मित्राची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना वसईत ऊघड झाली आहे. या घटनेत वालिव पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला असुन अरोपी मित्राला वालिव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांच्या ताब्यात असणारा हाच आहे तो ज्याने आपल्याच मित्राची निर्घुणपणे हत्या केली आहे. सुनिल उर्फ़ समीर लुगुन असे या आरोपीचे नाव आहे. तर हनुमान उर्फ़ तिरथ गाजीदिन पटेल असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. हे दोघेही मुळचे झारखंड येथील रहिवाशी असुन कामा निमित्त वसईत राहत होते. वसई पुर्वेकडील तुंगारेश्वर मंदिर रस्त्यावरिल गिदराईपाडा येथील रामा पिलाना चाळीत रुम करुन राहत होते. हे दोघेही मजुरीचे काम करित होते. शनिवारी सायंकाळी या दोघांनीही एका ठिकाणी दारु पिली. त्यानंतर मयत हनुमान हा झोपण्यासाठी रात्री बाराच्या सुमारास रुमवर जाऊन झोपला होता. त्यानंतर एकच्या सुमारास पुन्हा आरोपी सुनिल हा रुमवर गेला. त्याने अनेकवेळा रुमचे दार वाजविले. पण हनुमान याने काही दार काडले नाही. शेवटी आरोपी सुनिल याने रुमची पाठीमागील खीडकी काडुन झोपलेल्या मित्राच्या अंगावर पाणी टाकले. या घटनेत दोघेही दारुच्या नशेत असल्याने यांच्यात वादविवाद झाला. याच वादातुन आरोपी सुनिल याने लाकडी काठीने हनुमान याला मारण्यास सुरु केले. या मारहाणीत डोके, तोंड, हनुवटी, वर लाकडाने मारहाण केली आणी तो खाली पडल्यावर चक्क एक दगड त्याच्या छातीत टाकुन त्याला गंभीर जखमी केले. यात हनुमान याच्या छातीच्या बरगडी तुटल्याने तो जागीच गतप्राण झाला होता. ्या घटनेच्या नंतर रुमच्याच एका पाठिमागील जंगलात मृतदेह टाकुन आरोपी फ़रार झाला होता. रविवारी सकाळी वालिव पोलिसांना हा मृतदेह सापडला होता. मृतदेहाची ओळख पटवुन, शवविच्छदन केले असता त्याची हत्या केली असल्याचे उघड झाले. वालिव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन आरोपी मित्राला बेड्या ठोकण्यात यश मिळविले आहे.
दारुच्या नशेत असलेल्या मित्राने केवळ रुम चे दार काडले नाही, एवढ्याच कारणावरुन मित्रानेच मित्राची हत्या केली ही घटनाच प्रत्येकाच्या मनाला चटका लावुन जाते, पण हे वसईतील घटनेवरुन सिध्द झाले आहे. त्यामुले माणसाला दारु कीती विनाशाकडे नेते हे समोर आले आहे.