Team Khulasa

वसई: वसई मध्ये गुजराती परिवार वसई, यंगस्टार ट्रस्ट विरार, वसई तालुका ज्येष्ठ नागरीक संघ, वसई तालुका अँटी ड्रग्स ब्रिगेड आणि द प्रेस क्लब ऑफ वसई-विरार यांच्या सयुंक्त विद्यामाने पंतगमहोत्सवाचा भव्य कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
वसई मध्ये नशामुक्त देश आणि नशामुक्त महाराष्ट्र करण्याच स्वप्न घेत पंतगमहोत्सव साजरा करण्यात आला. आजच्या तरुणांना नशा पासून दूर राहणासाठी तरुणामध्ये असलेली पंतग उडवण्याची क्रेझ हेरून हा पंतगमहोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शेकडो नागरीकांनी यात सहभाग नोंदवला. आकाश अगदी रंगबिरेंगी पतंगांनी न्हाऊन गेला होता. वसईच्या सनसिटी मैदानात हा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी नशा मुक्तीच्या प्रचारासाठी एक पथनाटया ही भरवण्यात आलं होतं.