Team Khulasa

मिरारोड: मुंबई मधील काशी मीरा परीसरातील पेंडकर पाड्या मध्ये १६ जानेवारी ला सकाळी दोन चोरांनी गणेश मंदिराचा तळा तोडून दानपेटी मधील दोन लाख रुपयांची चोरी केली. चोरी करणाऱ्या दोघांच्याही हलचाली मंदिरात असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून कशी मीरा पोलीस त्या मदतीने चोरांचा शोध घेत आहे.

काशी मीरा पेंडकर पाड्याती हे मंदिर अतिशय जुने आहे. या मंदिरात पेंडकर पाड्यासहित आसपासच्या परिसरातील देखील श्रद्धाळू लोक गणपती बाप्पा ची पूजा करायला येत असतात. मंदिरात बाप्पा च्या समोर असणाऱ्या दानपेटी मध्ये सर्व आपल्या श्रद्धे नुसार दान करतात असतात. या दानपेटी मधील पैसांचा वापर मंदिराचे ट्रस्टी दर वर्षी २१ जनेवारी ला मोठी पूजा करण्यासाठी वापरतात त्यामुळे पूर्ण वर्षाचे दान केलेले पैसे हे दानपेटीत मध्येच असतात. या वर्षी मात्र या चोरांनी या दानपेटी दोन लाख रुपये चोरी करून फरार झाले आहेत.

सकाळी जेव्हा मंदिराचे पुजारी पूजा करण्यासाठी आले तेव्हा त्यांनी पहिले की, मंदिराचा मुख्य दरवाज्याचा टाळा तुटलेला आहे आणि मंदिरात जाऊन पहिले तर दानपेटी देखील तुटलेल्या अवस्थेत होती. त्यानंतर पुजार्यांनी मंदिराच्या ट्रस्टी ला झालेल्या प्रकाराची नोंद दिली व नंतर चोरीची तक्रार नोंदवली गेली.