Team Khulasa

भाईंदर: भाईंदर पूर्वेला असणाऱ्या केबिन क्रोस रोड जवळील तोरल कृपा सोसायटी मध्ये शनिवारी रात्री बाईक चोरी झाल्याची घटना घडली परंतु चोराच्या सर्व हलचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून नवघर पोलीस कॅमेऱ्यातील सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या चोराचा शोध घेत आहे.
भाईंदर पूर्वेला एक अज्ञात गुह्स्थ शनिवारी रात्री २ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास एका रिक्षातून आला व तोरल कृपा सोसायटी मध्ये गेला . आजूबाजूच्या परिस्थितीची चाहूल घेऊन सोसायटी मध्ये पार्क केलेली लाल रंगाची दुचाकी सहज घेऊन फरार झाला. जतीन दर्जी या गृहस्थांची हि दुचाकी होती. झालेला सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही मधील चोराकडे पाहिले तर त्याचे कपडे व राहणीमान पाहून कोणाला असे वाटणार देखील नाही की, हा कोणत्याही प्रकारची चोरी करण्यास आला आहे. परंतु दिसत तस नसत ….
जतीन दर्जी यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलीस आरोपी चा शोध घेत आहेत.