Team Khulasa

विरार: विरार मध्ये असणाऱ्या भाऊसाहेब वर्तक हॉल मध्ये मराठी साहित्य संमेलनाचा सोहळा २० जानेवारी २०१८ रोजी सायंकाळी ४ वाजता पार पडला. मयुरेश प्रकाशन व मयुरेश उमाकांत वाघ मित्र मंडळ यांच्या तर्फे या या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या मेळाव्यात बडोदा येथे होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख सर यांचा जाहीर सत्कार केला गेला. देशमुख सरांनी आपले बहुमोल विचार हा मेळाव्यात मांडले. श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांचा हा सत्कार वसई-विरारकरांतर्फे झाला असून साहित्य-वाचनप्रेमींनी , कवी लेखकांनी बहुसंख्येने ह्या मेळाव्यात उपस्थिती दाखवली. ‘साहित्य संगम’ नावाचे पुस्तक या मेळाव्यात प्रकाशित केले गेले.
या मेळाव्यात जेष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांचा देखील मोठ्या प्रमणात सहभाग दिसून आला. नगरसेवक अजीव पाटील, आर.पी.आय जिल्हा अध्यक्ष ईश्वर धुळे तसेच फादर डीब्रेटो, मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष राजीव तांडेल, महानगरपालिकेचे उपायुक्त अझीझ शेख त्याचबरोबर खाजदार डॉ. चिंतामण वनगा हे ह्या मराठी साहित्य संमेलन सोहळ्याचे मान्यवर म्हणून या सोहळ्यात उपस्थित होते.