Team Khulas

मुंबई: मिरारोड मध्ये एका २१ वर्षाच्या तरुणाने प्रेमभंग झाल्याने स्वत:च्या पोटात स्वत:ला गोळी मारून घेतली. जखमी इसमाचे नाव जयप्रकाश गिरी असे आहे. त्याला कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात त्याला दाखल केले गेले असून त्याची प्रकृती फार गंभीर आहे.
मंगळवारी दुपारी मिरारोड मधील रॉयल कॉलेज परिसरात जयप्रकाश गिरी याने देशद्रोही बंदुकीने स्वत:च्या पोटात गोळ्या झाडून आत्महत्या केली. प्रथम त्याला मीरा रोड मधील इंदिरा गांधी हॉस्पिटल मध्ये त्याला दाखल केले गेले परंतु त्याची प्रकृती अधिकच गंभीर झाल्यामुळे त्याला कांदिवली च्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले.
भाईंदर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी असे सांगितले की, जयप्रकाश गिरी याची प्रकृती सध्या गंभीर आहे. परंतु त्याची प्रकृती थोडी सुधारली की त्याची चौकशी केली जाईल. जयप्रकाश ला हॉस्पिटल मधून सोडले की त्यांच्यावर कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल.
ठाणे ग्रामीण पोलिसांनी ज्या जागी जयप्रकाश गिरी याने आत्महत्ये चा प्रयन्त त्या जागेचा तपास करून ते बंदूक शोधून काढले आहे व ते पडताळण्यासाठी फॉरेन्सिक लॅब मध्ये दिले आहे. त्याचा अहवाल येताच जयप्रकाश गिरी यांची देखील चौकशी केली जाईल असे पोलिसांनी सांगिलते आहे.