Team Khulasa

भाईंदर: भाईंदर पोलिसांनी शेळ्या चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळ्या आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हि टोळी ओला कार आणि टेम्पो च्या आधारे ब शेळ्या चोरायचे काम करत होती . मात्र गुरुवारी रात्री भाईंदर पश्चिमेकडील जय अंबे नगर मधून या टोळी ने पाच शेळ्या चोरल्या होत्या, ह्या सर्व प्रकाराचा उलघडा करताना भाईंदर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज च्या मदतीने या टोळीतील एका सदस्याला नालासोपारा मधून अटक केली असून सर्व शेळ्या ताब्यात घेतल्या आहेत.

पोलिसांनी ज्या इसमाला ताब्यात घेतले आहे त्याचे नाव दिलीप कुमार केदार प्रसाद असे आहे हा एका टैक्सी कंपनीत चालक म्हणून कामाला आहे असे पोलिसांनी सांगितले. दिलीप आपल्या अजून चार साथीदारांन सोबत मिळून रात्री च्या वेळी शेळ्या चोरून त्या विकत असे, पण या वेळी त्यांच्या नशिबाने त्यांचा घात केला. भाईंदर पश्चिमेला जय अंबे नगर ला राहणारा फिरोज निजाम शेख याने बकरीईद साठी आणलेल्या पाच शेळ्या घराबाहेरच ठेवल्या होत्या. गुरुवारी रात्री ३.३० च्या सुमारास दिलीप व त्याच्या साथीदारांनी मिळून या शेळ्या चोरल्या परंतु त्याच वेळी भाईंदर पूर्व- पश्चिमेला जोडणाऱ्या सबवे मधील सीसीटीव्ही कैमेऱ्यात या गाड्यांची सर्व हकीकत कैद झाली. याच सीसीटीव्ही फुटेज च्या मदतीने भाईंदर पोलीस या बकरा चोर टोळी पर्यंत पोहचले.

भाईंदर पोलीस आता दिलीपच्या फरार असलेल्या साथीदारांचा शोध घेत आहेत. त्याचबरोबर या टोळी ने अजून किती आणि कुठे कुठे चोरी केली आहे याचा तपास पोलीस करत आहेत.