Team Khulasa

मीरारोड: मीरा भाईंदर मध्ये असणाऱ्या काशीमीरा परिसरात रस्त्याच्या फुटपाथवर प्रातर्विधी केल्या जात असल्याचा प्रकार, एका विडीओ द्वारे काही दिवसांपूर्वी समोर आला होता. रस्त्यावर प्रातर्विधी करणे म्हणजे अस्वच्छ परिसर होण्यात मदत करणेच म्हणता येईल. पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे शहर सचिव शान पवार यांनी आपले सरकार पोर्टवर तक्रारदेखील केली होती मात्र याचा कोणताही परिणाम अद्यापहि पालिकेवर झालेला नसल्याचे दिसून येत आहे.
काशीमीरा नाक्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळ्यापासून जो रस्ता भाईंदर पूर्व आणि पश्चिमेस जातो त्या भागातील फुटपाथ वर प्रातर्विधी करणाऱ्यांना पालिकेने थांबून त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी मनसे चे शहर सचिव शान पवार यांनी प्रयत्न केला होता मात्र आता त्याच फुटपाथ वर प्रातर्विधी ताडपत्री लावून केल्या जातात असे समोर आले आहे. यामुळे मीरा भाईंदर महापालिकेचा आरोग्य विभाग याकडे गांभीर्याने लक्ष का देत नाही? असा सवाल निर्माण झाला आहे.
ह्या सर्व प्रकाराबाबत मनसेचे शहर सचिव शान पवार यांनी, आपले सरकार पोर्टवर १२ फेब्रुवारीला तक्रार केली होती, त्यावर महापालिका आरोग्य विभागाचे मुख्य आरोग्य निरीक्षक संदीप शिंदे यांनी शान पवार यांना त्यावर तातडीने उत्तर देखील पाठविले होते. मात्र अजूनही मीरा भाईंदरच्या मुख्य रस्त्यावर आंघोळ करण्याचे काम ताडपत्री लावून सुरूच आहे असे दिसते.