Team khulasa

वसई: महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिंदरे यांच्या मृतदेचे अवशेष शोधण्याचे काम घोडबंदर मधील वर्सोवा खाडीत सुरु करण्यात आले आहे. या शोधमोहिमेसाठी भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांची मदत घेतली जात आहे. अश्विनी बिंदरे यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते तुकडे एका लोखंडी पेटीत भरून ती पेटी वर्सोवा खाडीत आरोपींना फेकली असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. हीच पेटी शोधण्याची मोहीम पोलिसांकडून राबवण्यात येत आहे.

नवीमुंबई तील बेपत्ता पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिंदरे यांची हत्या झाल्याची खळबळजक बातमी समोर आली होती. अश्विनी बिंदरे यांची हत्या करून त्यांचे तुकडे करून वसई खाडीत टाकल्याची धक्कादायक कबुली आरोपी महेश फळणीकर यांनी दिली आहे. अश्विनी बिंदरे प्रकरणाची उकल अंतिम टप्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर, राजू पाटील, चालक कुंदन भंडारी आणि मित्र महेश फळणीकर यांना अटक करण्यात आली आहे.

महेश फळणीकर याने चौकशी दरम्यान कबूल केले की अश्विनी बिंदरे यांची हत्या लाकूड कापायचे कटर मशीनने करून तिचा मृतदेह 2 दिवस फ्रीज मध्ये ठेवून नंतर वसई च्या खाडीत फेकून दिला.

भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांना सोबत घेऊन मुंबई गुन्हा शाखेचे अधिकारी वसई च्या खाडीत अश्विनी बिंदरे यांचा मृतदेहाचे अवशेष शोधत आहेत परंतु अद्याप देखील त्यांना काहीच हाती लागले नाही आहे.