Team Khulasa

भाईंदर : मीरारोड येथील सिल्व्हर पार्क भागातील एका हॉटेलमध्ये चार महिन्याचे बाळ (मुलगा) विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांना मिळाली होती, त्यावरून मीरारोड विभागीय अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय बांगर यांनी हॉटेल परिसरात सापळा रचला, बाळ विक्रीसाठी आणलेल्या महिलेकडे एक नकली ग्राहकाला पाठवून सौदा केला ६ लाख रुपयात सौदा पक्का झाला, त्या चार महिन्याच्या मुलाला देण्यासाठी आलेल्या एक महिला आणि पुरुषाला तसेच त्या दलाल महिलेला पोलिसनी अटक केली.
पोटच्या चार महिन्यांच्या मुलाची सहा लाख रुपये घेऊन विक्री करणाऱ्या आई-वडील आणि एका दलाल महिलेला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने अटक केली आहे. बाळ घेऊन आलेले दाम्पत्य बाळाचे आई वडीलच असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या बरोबर १० वर्षाचा एक मुलगा आणि अडीच वर्षाची मुलगी होती, आपल्याला दोन मुले असताना तिसरे मूल झाले, त्यांचे चांगले पालन पोषण करण्याची आर्थिक स्थिती नाही, त्यांचे शिक्षण व्हावे,ते वाईट वळणावर जाऊ नयेत म्हणून आपण राजस्थान मधील उदयपूर येथील राधिका चाईल्ड केअर बालगृह चालविणाऱ्या महिलेशी संपर्क साधून मूल विक्री करत असल्याचे कबुल केले.
बालकांना सुधार गृहात पाठवून एक पुरुष आणि दोन महिलांना भारतीय दंड संहिता व बालकांचे संरक्षण अधिनियमा नुसार अटक केली असून पुढील तपास मीरारोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रकाश पवार करीत आहेत.