Team Khulasa

विरार: पालघर जिल्ह्यात मध्ये लोकसभा पोटनिवडणूकीसाठी भाजपाने मुलाखती सुरु केल्या आहेत. या सुरु झालेल्या मुलाखतीं मुळे भाजपती प्रस्थापितांना चांगलेच अडचणीत आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या ‘वॉर रूम’ मधील निरीक्षकांकडून जिल्ह्यातील पदाधिकार्यांच्या मुलाखतीचे सत्र पालघर मध्ये बुधवार पासून सुरु झाले आहे.त्यामुळे ही निवडणूक बिन विरोध होण्याचे चिन्ह कमी आहे.
तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मुलखती घेण्यास मुख्यमंत्र्यांच्या ‘वॉर रूम’ मधील निरीक्षकांकडून सुरुवात झाली आहे. पक्ष वाढवण्यासाठी काय उपययोजना केल्या जाव्यात,लोकसभा पोटनिवडणूकीसाठी कोणाला उमेदवारी द्यावी, इच्छुकांच्या मजबूत व कमकुवत बाजू त्याचप्रमाणे मतदारांची जातीनिहाय विभागणी यांची माहिती ह्या मुलाखतींमधून घेतली जाणार आहे.

नागरिकांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री यांच्या कडून काय आणि कशा प्रकारचे प्रयन्त केले जातात, लोकप्रतिनिधी कार्यालयात किती वेळ येतात, लोकांच्या सम्स्या सोडवण्यास कितीपत उत्सुकता दाखवतात. ह्या सर्व गोष्टींचा आढावा ‘वॉर रूम’ मधील निरीक्षकांकडून घेतला जात आहे. या ३० मिनिटांच्या मुलाखतींत इतर राजकीय पक्षांतील नेते, मतदारसंघ प्रभावी ठरणारे मुद्दे याबाबत देखील पदाधिकार्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत.
पालघर लोकसभा मतदारसंघाचा जोरदार अभ्यास भाजप श्रेष्ठांनी सुरु केला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील प्रस्थापित मंडळींनची स्वप्न भंग होण्याची चिन्हे आहेत.