Team Khulasa

मिरारोड: मिरारोड पोलिसांनी दोन गुंडांना अटक केली आहे, जे पैसे कमवण्यासाठी खसदार, आमदार किंवा प्रख्यात नेत्यांच्या नावांचा आधार घेऊन हॉटेल व्यवसायिकांकडून बेकायदेशीर रित्या वसुली करत होते. आरोपी सिद्धेश सामंत वर मुंबई च्या अनेक पोलीस स्टेशन मध्ये देखील या प्रकारच्या बेकायदेशीर वसुलीचे गुन्हे दाखल आहेत.

मीरा रोड पोलिसांनी आरोपी सिद्धेश सामंत आणि राजेश केशव प्रसाद मिश्रा या दोघांना भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या नावाच्या गैरवापर करून बेकायदेशीररित्या हॉटेल व्यवसायिकांकडून वसुली करण्याच्या गुन्ह्यात अटक केले आहे.

हे दोन्हीं आरोपी कोणत्याना कोणत्या राजकारण्याचे नाव वापरून बेकायदेशीर पणे व्यापारांकडून पैसे उकळण्याचे काम करत होते ज्यामुळे ते आधी देखील पोलीस कोठडीत होते. पण पोलीस कोठडीतून बाहेर आल्यानंतर ते पुन्हा हे काम करायचे, असे पोलिसांनी सांगितले.

या सर्व प्रकरणानंतर भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी लोकांना आवाहन केले आहे की अशा भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका व अशी घटना घडली तर वेळीच पोलिसांना कळवून अशा भामट्यांना पोलिसांच्या स्वाधीन करून त्यांना जेरबंद करण्यास मदत करा.