Team Khulasa

मीरारोड: खुलासाची टीम गेल्या काही दिवसापासून मीरा भाईंदर मधील काशीमीरा मध्ये फुटपाथवर खुलेआम केल्या जाणाऱ्या प्रातर्विधींचा पाठपुरावा करत होती. मनसे चे शहर सचिव शान पवार यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले, असे म्हणायला आता काही हरकत नाही. सतत तक्रारी करून देखील पालिका दुर्लक्षच करीत होती, परंतु मनसे चे शहर सचिव आणि खुलासा यांच्या अथक परिश्रमाचे फळ पालिकेला द्यावेच लागले.
मीरा भाईंदर महापालिका आरोग्य विभागाचे मुख्य आरोग्य निरीक्षक संदीप शिंदे यांच्या आदेशावरून या ठिकाणी फुटपाथवर ज्या काही प्रातर्विधी केल्या जायच्या त्यांना अखेर आळा बसला गेला आहे. यामुळे इथे राहणाऱ्या नागरिकांना आता अस्वच्छतेला सामोरी जावे लागणार नाही. त्याचबरोबर या परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या स्त्रियांना देखील आता शरमेने मान खाली घालून जावे लागणार नाही आहे.
काहिदिवशांपूर्वी या सर्व गोष्टींकडे मीरा भाईंदर महापालिकेचा आरोग्य विभाग गांभीर्याने लक्ष का देत नाही? असा सवाल निर्माण झाला होता. मात्र पालिकेने आता याकडे गांभीर्याने लक्ष दिले असल्याचे दिसून येत आहे. आधी खुलेआम तर नंतर ताडपत्री लावून इथे प्रातर्विधी केल्या जात होत्या मात्र आता फुटपाथ वर प्रातर्विधी करणे पालिकेने पूर्णपणे बंद केले आहे.