Team Khulasa

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत बिघाड झाली आहे. राजस्थानमधील जोधपूरमध्ये ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ सिनेमाच्या शूटिंगवेळी बिग बींची प्रकृती बिघडली.

जोधपूरमधील अजित महल या हॉटेलमध्ये सध्या अमिताभ बच्चन आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मुंबईतून चार्टर विमानाने 10 डॉक्टर जोधपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.

मुंबईतून निघालेले डॉक्टर जोधपूरला पोहोचल्यानंतर, अमिताभ बच्चन यांची तपासणी करतील आणि त्यानंतर पुढील उपचारासंदर्भातील निर्णय घेतला जाईल.