Team Khulas

नालासोपारा: विरार वसई महापालिकेने भारत स्वच्छता अभियान २०१८-१९ मध्ये भाग घेतला आहे. स्वच्छ भारत अभियान सरकार वेगवेगळ्या पातळीवर राबत असतना काही विभागात साधी कचऱ्याची पेटी देखिल उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे, आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील उभा राहिला आहे.
नालासोपारा येथील वलई पाडा मध्ये जिल्हा परिषद मराठी शाळेभोवती कचऱ्याचे साम्राज्य वाढलेले दिसून येत आहे. या ठिकाणी शाळेत विद्यार्थी ये- जा करत असतात त्यामुळे येणाऱ्या दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांच्यां आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.
वलई पाडा येथे गटारलाईन तुटल्यामुळे पालिकेची कचऱ्याची गाडी आत जाऊ शकत नाही. आणि त्या ठिकणी कोणतीही कचरापेटी उपलब्ध नसल्याने तेथील नागरिक रत्यावर कचरा टाकतात आणि त्यामुळे घाणीचे साम्राज्य हे वाढले असल्याचे दिसून येते. या बाबत स्थनिक नगरसेवकांनी पुढच्या २ दिवसात कचरा पेटी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.