Team Khulasa

विरार : विरार पूर्वेला असणाऱ्य अे.आर. पटेल ट्रेडींग या किरणामाला च्या दुकानात सामान घरी पोहचवणाऱ्या मुलाने घरी सामान पोहचवायला गेला असताना एका मुलीची छेड काढल्याची घटना समोर आली आहे. अे.आर. पटेल ट्रेडींग या दुकानात काम करणाऱ्या मुलाला स्थानिकांनी व सेना शाखा प्रमुखांनी चांगलाच चोप दिला व विरार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
अे.आर. पटेल ट्रेडींग हे दुकान विरार पूर्वेला असून या मध्ये काम करणारा गणेश पटेल (२७) ह्या डीलेवरी बॉय ने ४ एप्रिल रोजी सायंकाळी विरार पूर्वेला असणाऱ्या जीवदानी रोड वर वरील प्रेम नगर ला असणाऱ्या अमित एंक्यूव्ह, रू नं २०२ या सोसायटीत जाऊन तिचा भ्रमणध्वनी मागत मागितला व आपण बँगलोर फिरायला जाऊ, मज्जा करू असे देखील बोलला.
हा झालेला सर्व प्रकार मुलीने आपल्या घरच्यांना सांगितला, व नंतर घरच्यांनी शिवसेनेचे शाखा प्रमुख केयुर वरवटकर यांना संगीतले, त्यानंतर केयुर वरवटकर व शिवसैनिक मनिष वैद्य विभाग प्रमुख, रोशन जाधव विभाग अधिकारी व विजय जंगम उपशाखा प्रमुख यांनी त्या मुली सोबत व तिच्या कुटुंबीयांसोबत अे.आर. पटेल ट्रेडींग या दुकानात जाऊन त्या डीलेवरी बॉय गणेश पटेल ला चांगलाच चोप दिला. व विरार पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. आरोपी हा मुळचा बँगलोर चा रहिवाशी असल्याचे चौकशी दरम्यान समोर आले आहे.