Team Khulasa

अंबरनाथ : अंबरनाथच्या जावसई परिसरातील डोंगरात आज सकाळच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा शीर नसलेला मृतदेह स्थानिकांना सापडला. मृत इसमाचं वय ३० ते ३५ च्या दरम्यान असावं, असा अंदाज नागरिकांमधून वर्तवण्यात येत आहे.

दारु पाजून तीन ते चार जणांनी त्याची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हत्या केल्यानंतर त्याचं शीर कापून लांब नेऊन फेकण्यात आलं, तर शीर नसलेला मृतदेह दरीत फेकून देण्यात आला.

ही घटना समोर आल्यानंतर अंबरनाथ पोलिसांसह ठाणे क्राईम ब्रँच आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.