Team Khulasa

विरार: विरार मध्ये चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अगदी दिवसा ढवळ्या सुध्या निडर पणे चोरी होत असल्याचे समोर आले आहे. विडीओ मध्ये दिसणाऱ्या या महिला दिसायला भिक मागणाऱ्या दिसत असल्या तरी, त्या चोरट्या महिला आहे. अंगावर फाटके कपडे घालून चोरी करणाऱ्या महिला टोळीचा नागरिकांनीच पडदा फाश केला आहे. व ह्या तीन महिला चोरांना पडून नागरिकांनी विरार पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
विरार पूर्वे कडील पुलपाडा रोड येथे मनिष राऊत हे आपल्या पत्नी, सासू व २ मुलांसोबत गेल्या ६ वर्षापासून राजीव पाटील बिल्डींग मध्ये पहिल्या मजल्यावर राहतात. मनिष हे इंटीरिअर डेकोरेटर्स चा व्यवसाय करतात. असे पोलिसांनी सांगितले. १२ फेब्रुवारी रोजी मनीष यांची सासू सकाळी ७ वाजता बँकेच्या कामानिमित्त सांताक्रुज येथे निघून गेल्या. व त्यानंतर मनीष हे ७.३० च्या दरम्यान मॉर्निंग वॉक साठी जाताना समसंग, जिओ व आय फोन ६ प्लस हे तीन मोबाईल चार्जिंग ला लावून सेफ्टी दरवाजा ओढून निघून गेले. ज्या वेळी मनिष ८.१५ ला घरी परतले तेव्हा हॉल मध्ये चार्जिंग साठी ठेवलेले तिन्ही मोबाईल गायब झाले होते. सगळीकडे शोधा शोध करून देखील मोबाईल घरात कुठेही सापडले नाहीत तेव्हा मनिष यांनी विरार पोलीस स्टेशन गाठले व अज्ञात चोरट्या बद्दल १२ फेब्रुवारी ला तक्रार नोंदवली. झालेला सर्व प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मनिष राऊत यांनी चोरीचे सीसीटीव्ही फुटेज सर्वत्र वायरल केले होते. त्यामुळे आज ह्या चोरट्या महिला टोळीला पकडण्यात यश आले. मनिष राऊत यांच्या दिनेश पाटील नावाच्या मित्राने वायरल झालेल्या विडीओ तील महिला ह्या सेंट पीटर शाळेशेजारी वावटेवाडी मध्ये फिरत असल्याची माहिती मनीष यांना दिली. जेव्हा दिनेश पाटील त्या महिलांना पकडण्यासाठी गेले तेव्हा त्या नग्न होऊन पळू लागल्या , त्या महिला जवळपास सेंट पीटर शाळेपासून जीवदानी रोड पर्यत पळाल्या नंतर मनिष राऊत यांनी त्यांच्या अजून काही मित्रांच्या मदतीने त्या महिलांना पडकून विरार पोलिसांच्या स्वधीन केले. विरार पोलीस या सर्व प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.