Team Khulasa

विरार: आज कालच्या तरूण पिढीत लाज हा प्रकार राहिलाच नाही असे दिसून येते. दिवसा ढवळ्या विरार पूर्वेला असणाऱ्या स्काय वॉक वर प्रेमी आपले प्रेम ओतू घालवत असल्याची दृश्य समोर आली आहेत. आजूबाजूला नागरिकांची वर्दळ असताना देखील कसलेच भान न ठेवता एकमेकांच्या गळ्यात गळे घालून चुंबन घेतानाची हि दृश्ये आहेत.

आजकालची पिढी हि निडर, बिन्दास्त आहे, हि जितकी कौतुकाची बाब आहे, तितकीच शरमेची बाब देखील बनली आहे. ज्या ठिकाणी नागरिकांची ये जा करण्याची वाट आहे त्या ठिकाणी काही तरुण पिढीतील मुल मुली अश्लील चाळे करत असतात. हे सर्व करताना त्यांना तर लाज नाहीच वाटत, परंतु तेथून जेष्ठ नागरिक किंवा लहान मुलांना घेऊन जाणारे पालक मात्र मान शरमेने खाली घालून पुढे जातात.

विरार पूर्वेचे स्काय वॉक हे सार्वजनिक ठिकाण आहे. येथे सायंकाळी च्या वेळेस लहान मुले देखील असतात त्यामुळे या सर्वाचा लहान मुलांवर देखील वाईट परिणाम होतो. या ठिकाणी असे अश्लील चाळे करणाऱ्यांवर काहीतरी कारवाई करने गरजेचे आहे. अशा काही चुकीच्या तरुणांमुळे सर्वच तरुण पिढीकडे चुकीच्या नजरेने पहिले जाते. अशी वागणूक करणाऱ्या तरुणांना वेळीच आळा घालणे महत्वाचे आहे. आपल्या भारतीय संस्कृतीवर देखील असा घटनेमुळे बोट उचले जात आहे. पालक या भ्रमात असतात कि आपली मुलं कॉलेज जा जाऊन शिकत आहेत. परंतु मुलांचे घराबाहेर स्काय वॉक वर असे अश्लील चाळे चालले असतात.