Team Khulasa

मिरारोड: मिरारोड मधील काशीमिरा परिसरात सोनसाखळी चोरट्यांना पोलिसांनी अटक केले आहे. मुंबई आणि आस-पास परिसरात ५० पेक्षा अधिक गुन्हे या चोरट्यांवर दाखल आहेत. सोनसाखळी चोरट्या सह त्याची पत्नी आणि तीन आरोपींना लोकल क्राईम ब्रांच काशीमिरा युनिटने अटक केली आहे.

पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपीचा नाव प्रदीप बनर्जी असे आहे आणि आरोपी लक्ष्मीकांत दास यांना मुंबईच्या सांताक्रुज येथून अटक करण्यात आले आहे. आरोपीं वर ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, पालघर मुंबई सहित अनेक ठिकाणी ५० हून अधिक सोनसाखळी चोरीच्या गुन्हांची नोंद आहे. प्रदीप च्या पत्नीला देखील अटक करण्यात आली आहे.

मागील काही महिन्यात मीरा-भाईंदर परीसरामध्ये सोनसाखळी चोरीच्या गुन्हानमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. आरोपी सफेद रंगाच्या नंबर प्लेट नसलेला अक्टीवा वर फिरायचा आणि रस्त्यावरुन चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन तसेच मंगळसूत्रांची जबरीने चोरी करुन क्षणात पसार होत होता. पोलिसांनी सीसीटीवी फुटेज आणि तांत्रिक तपासच्या विश्लेषण करुन सराईत चैन स्नचर प्रदीप बनर्जी याला अटक केली .

आरोपी प्रदीप बनार्जी जानेवारी २०१८ मध्ये मध्यवर्ती कारागृह ठाणे येथून जामिनावर बाहेर आला. बाहेर येताच प्रदीप ने अक्टीवा मोटरसायकल चोरी केली आणि त्याचा वापर करुन मिरारोड, दहिसर या भागात अनेक गुन्हे केले. या गुन्हे गारांना अटक करण्यामध्ये काशिमिरा पोलीसांना यश मिळाला.