Team Khulasa

विरार: विरार मध्ये नारंगी ला असणाऱ्या एकविरा मंदिरात काल रात्री दोन वाजता च्या दरम्यान चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. घरफोड्या, लुटमार, हत्या, बलात्कार या घटना सतत होत असतातच मात्र चोरांनी देवाला देखील सोडले नसल्याचे दिसून येते.
लाखोच्या घरात असणारी लोकसंख्या आणि त्यामानाने कायदासुव्यवस्थेचे समायोजन करण्यास पोलीस प्रशानाला मात्र अपयश आल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात वाढत असणाऱ्या गुन्हेगारीच्या प्रमाणामुळे पोलीस दलाची नाचक्की होऊ लागली आहे.
मंदिरात झालेल्या चोरीचा सर्व प्रकार हा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून चोराने मंदिराच्या खिडकीतून प्रवेश करून देवीचे दागिने व किंमती ऐवज व त्यानंतर मंदिरातील दानपेटी हि मंदिराबाहेर असणाऱ्या सहकार्याकडे देऊन पळ काढल्याचे कॅमेऱ्यात दिसून येत आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत