Team Khulasa

विरार: विरार पूर्वेकडील मनवेल पाड़ा येथिल CM नगर येथे गटारालाईन नसल्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात दिसत आहे. विरारची लोकसंक्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विरार मधील CM नगर भर वस्तीचा परिसर असुन वसई विरार शहर महानगरपालिकेचे नगरसेवक येथे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहेत.
रोयल पब्लिक शाळेच्या परिसरातच गटाराची पाईप लाईन नसल्या मुळे डबक्यातील दूषित पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे नागरिकांन सोबत शाळेतील विध्याअर्थी देखील येथून ये-जा करत असतात. याठिकाणी मोठया प्रमाणात वर्दळ असते. नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात असल्याचे दिसून येते.

चक्क डबक्यात दुषित पाण्याचा निचरा केला जात आहे. नगरसेवक याकडे कधी लक्ष देतील? नागरिकांच्या आरोग्या सोबत नगरसेवक खेळत आहेत का? असा प्रश्न नागरिकांत निर्माण होत आहे.